पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील एका पोलीस अंमलदाराने निगडी येथील ट्रान्सपोर्टनगर मध्ये सर्विस रिव्हॉल्वर मधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज २६ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.
विजय मोतीलाल कोळी (वय ३६ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या पोलीस अंमलदाराचे नाव असून ते पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत होते. निगडी येथील ट्रान्सपोर्टनगर बस डेपो परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला.
प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादामुळे ते काही दिवसांपासून तणावाखाली होते. बुधवार, २३ सप्टेंबर रोजी झालेल्या घरगुती वादानंतर ते घरातून निघून गेले होते आणि मागील दोन-तीन दिवसांपासून बेपत्ता होते. आज शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
निगडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
