ब्रेकिंग न्यूज

तरुणाला अडवून ३ हजार २०० रुपये लुटले; एका आरोपीला अटक

Share

पिंपरी – भोसरी सहल केंद्रासमोरील रस्त्यावर रात्रीच्या वेळी पायी जाणाऱ्या एका तरुणाला अडवून दमदाटी करत जबरदस्तीने रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

दीपेंद्र बदामसिंग राजपूत (वय ३०, रा. लांडेवाडी चौक, भोसरी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आदेश ज्योतीराम सुरवसे (वय १९, रा. संत तुकारामनगर, भोसरी) याच्यासह एका २० ते २४ वर्षे वयाच्या अज्ञात साथीदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपेंद्र हे जेवण करून घरी जात असताना दोन अनोळखी तरुणांनी त्यांना अडवले. “तुझ्याकडचे सर्व पैसे काढून दे” अशी मागणी करत त्यांनी दमदाटी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला असता एका आरोपीने त्यांचे हात घट्ट पकडले तर दुसऱ्याने पँटच्या खिशातून ३,२०० रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली आणि अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आदेश सुरवसे याला अटक केली आहे.