‘तुम्ही स्वत:ला देव समजता का ?’ मुंबई उच्च न्यायालयाने ‘एफडीए’ला फटकारले
मुंबई- एकीकडे तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात एफडीएकडून होत असलेल्या कारवाईचे सर्वसामान्य नागरीकाकांकडून कौतुक होत आहे. परंतु या कारवाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल, कॅन्टीन चालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अशाच एका कारवाईनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने एफडीएला कडक शब्दात समज दिली. तुम्ही देव आहात, तुम्ही काहीही करू शकता असं तुम्हाला वाटतं का? अशा शब्दात फटकारले.
२० ऑगस्ट रोजी FDA ने केलेल्या पहिल्या तपासणीत MCA क्लबच्या किचनला ११० पैकी ८७ गुण मिळाले होते. त्यानंतर २५ ऑगस्टला पुन्हा निरीक्षणाचे आदेश देण्यात आले. २७ ऑगस्ट रोजी झालेल्या दुसऱ्या तपासणीत किचनचे गुणांकन वाढून 95 झाले. तरीही कारवाई सुरू राहिल्याने MCA ने न्यायालयात धाव घेतली. सुनावणीदरम्यान समाधानकारक गुणांकन असताना किचनवर बंदी घालण्याच्या FDAच्या निर्णयावर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले.
मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. MCA वरील कारवाईदरम्यान एफडीएने कायदेशीर स्थितीचा पूर्णपणे अभ्यास न करता “अनावश्यक घाई” का केली? तुमचा विभाग आणि अधिकाऱ्यांना खडसावून थकलोय, अशा शब्दात उच्च न्यायालयाने एफडीएला सुनावले. तुम्ही देव आहात, तुम्ही काहीही करू शकता असं तुम्हाला वाटतं का? अशा कडक शब्दात ताशेरे ओढले. न्यायालयाचा अवमान म्हणून तुरुंगात जावं लागेल असा इशाराही देण्यात आला. तुमचे अधिकारी नाउमेद होवू नयेत म्हणून अजून कितीवेळा समतोल साधायचा? असा प्रश्न न्यायालयाने एफडीएला विचारले आहेत.
