पुणे- कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर नवले पुलाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सुमारे ५ ते ६ वाहने एकमेकांवर आदळल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातामुळे येथील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. अपघाताची घटना समोर आल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या अपघातात एका रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून, परिस्थिती सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
