पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल वापरण्यात आलेल्या अपमानास्पद भाषेवर आक्षेप घेतल्यामुळे ट्रोल झालेल्या अभिनेत्री ईशा कोप्पीकरने स्पष्ट शब्दांत “हो, मी देशासाठी अंधभक्त आहे, कोणाला अनफॉलो करायचं असेल तर करा,” असा सडेतोड पवित्रा घेतला आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईविषयी वापरण्यात आलेल्या अपमानास्पद शब्दांवर ईशा कोप्पीकरने तीव्र संताप व्यक्त केला होता. तिने या आंदोलनातील काही कृतींना लोकशाहीसाठी घातक आणि राष्ट्रविरोधी म्हटले होते. या भूमिकेनंतर सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले आणि काहींनी तिला ‘अनफॉलो’ करण्याची धमकीही दिली.
नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईवरुन अपमानास्पद भाषा वापरली गेली. यावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रियाही दिली. खल्लास गर्ल ईशा कोप्पीकर हिने सुद्धा आपले मत व्यक्त करताना स्वतःला ‘राष्ट्रवादी’ असे म्हटले आणि Gen Z विद्यार्थ्यांच्या या कृतीला ‘राष्ट्रविरोधी’ व लोकशाहीसाठी घातक म्हटले.
तिच्या या मतावर सोशल मीडियावर तिला भरपूर ट्रोल केले जात आहे. काही युजर्सनी तिला ‘अनफॉलो’ केले. आपण केलेल्या विधानावर इशा ठाम असून तिने या युजर्सना कडक शब्दात सुनावले आहे. ईशाने नमूद केले की, इन्स्टाग्रामवर तिला ‘अनफॉलो’ करण्यात आले, परंतु त्याचा तिला काहीही फरक पडत नाही. तिच्या या मतामुळे सोशल मीडियावर तिला भरपूर ट्रोल केले जात आहे. इतकेच नाही तर काही युजर्सनी तिला ‘अनफॉलो’ही केल्याचे समजते.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनांबाबत केलेल्या विधानांवरून टीका करणाऱ्यांवर अभिनेत्री ईशा कोप्पीकरने कडक शब्दात सुनावले आहे. ईशाने नमूद केले की, इन्स्टाग्रामवर तिला ‘अनफॉलो’ करण्यात आले, परंतु त्याचा तिला काहीही फरक पडत नाही. एका मनोरंजन वहिनीला मुलाखत देताना इशा कोप्पीकर म्हणाली की, सरकारला प्रश्न विचारण्याच्या आणि मुद्दे मांडण्याच्या विद्यार्थ्यांच्या अधिकाराचे समर्थन करते पण वैयक्तिक पातळीवर होणारी टीका, अपशब्द वापरणे आणि राष्ट्रविरोधी वर्तणूक याचा मी निषेध करते.
“इन्स्टाग्रामवर अनेक लोकांनी मला ‘अनफॉलो’ केलं, पण त्याचा माझ्यावर काहीच फरक पडला नाही. काही लोक ‘अनफॉलो’ करणारच, पण अनेकांनी मला ‘फॉलो’ही केलं आहे. अनेक लोकांनी मला ‘अंधभक्त’ म्हटलं. मी माझ्या देशासाठी ‘अंधभक्त’ आहेच. त्यामुळे मी माझ्या विधानावरून मागे हटणार नाही”
