पिंपरी- आर्थिक अडचणींना कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पिंपरी -चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरात घडली आहे. या घटनेत कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला असून पत्नी आणि १९ वर्षाची मुलगी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
प्राथमिक माहितीनुसार या घटनेत विनोद पिल्लई (वय ५०, रा. करिष्मा ग्लोरी सोसायटी, मोरवाडी ) यांचा मृत्यू झाला तर शैलजा पिल्लई (वय ४५), मुलगी पौर्णिमा पिल्लई (वय १९) यांच्यावर उपचार सुरु आहेत. तिघेजण मूळचे केरळ येथील असून करिष्मा ग्लोरी सोसायटीत भाड्याने राहत होते.
