पुणे- मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे पुणे यार्ड (पुणे-दौंड विभाग) येथे रविवारी, (दि. २) सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नऊ तासांचा विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे- लोणावळा लोकल आणि मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रकातील बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन पुणे रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मेगाब्लॉक काळात यार्डमधील जुने पॉईंट बदलणे आणि ५२ किलो क्षमतेचे लेआउट ६० किलो क्षमतेमध्ये श्रेणी सुधारित करण्याचे काम या काळात केले जाईल.
या ब्लॉकमुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १, यूपी मेन लाईन आणि लाईन क्र. १ ते ६ वरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
गाड्यांचे सुधारित वेळापत्रक
२ ऑगस्ट रोजी पुणे-तळेगाव-पुणे, पुणे-लोणावळा लोकल, लोणावळा-शिवाजीनगर लोकल, बारामती-पुणे डीईएमयू, सीएसएमटी मुंबई-पुणे-मुंबई एक्सप्रेस आणि पुणे-दौंड डीईएमयू पूर्णपणे रद्द
कमी अंतरावर थांबणाऱ्या गाड्यांमध्ये ३१ जुलैची जम्मू तावी-पुणे एक्सप्रेस, १ ऑगस्टची नागपूर-पुणे आणि अमरावती-पुणे एक्सप्रेस पुणे ऐवजी हडपसर स्थानकावर थांबेल.
२ ऑगस्टची मुंबई-पुणे एक्सप्रेस आणि १ ऑगस्टची जयपूर-पुणे एक्सप्रेस खडकी स्थानकावर थांबेल.
लोणावळा-पुणे गाडी शिवाजीनगर स्थानकावर थांबेल.
पर्यायी स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये
२ ऑगस्ट रोजी पुणे-लोणावळा लोकल शिवाजीनगरवरून सुटेल.
पुणे-जयपूर एक्सप्रेस खडकीवरून (सायं. ५ वाजून ३५ मिनिटांनी),
पुणे-नागपूर एक्सप्रेस हडपसरवरून (सायंकाळी पावणेसहा वाजता)
पुणे-मुंबई एक्सप्रेस खडकीवरून (सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी) सुटेल.
