विषारी दारू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपीच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून दोन बड्या पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पुणे अवैध विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापतीच्या संपर्कात असल्याचे कॉल रेकॉर्ड समोर आल्यानंतर उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी
अजित शिवाजी काळे आणि सुमित नंदकुमार वाघ यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. प्राथमिक तपास अहवालाच्या आधारे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायाला संरक्षण देणाऱ्या पोलीस आणि गुन्हेगारांच्या साठ्यालोट्याचे नेटवर्क पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.
या दुर्घटनेत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला असून एसआयटीकडून तपास सुरू आहे.
