ब्रेकिंग न्यूज

शिवनेर पतसंस्थेला 1 कोटी 20 लाखांचा नफा 

Share

पिंपरी – भोसरी येथील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेला 2025- 26 या आर्थिक वर्षांमध्ये 1 कोटी 20 लाख 59 हजार 356 इतका निव्वळ नफा झाला आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ यांनी दिली.

संस्थेचे एकूण 4403 इतके सभासद असून रु. 2 कोटी 76 लाख 78 हजार 250 इतके भागभांडवल आहे. संस्थेकडे रु. 39 कोटी 95 लाख 31 हजार 122 इतक्या ठेवी जमा असून संस्थेने रु. 34 कोटी 40 लाख 83 हजार 558 इतके कर्जवाटप केले आहे. संस्थेने बँकेमध्ये 15 कोटी 68 लाख 46 हजार 860 इतकी वैधानिक गुंतवणूक केली असून संस्थेची कर्जवसुली शे. 98.85 टक्के इतकी आहे. संस्थेचा निव्वळ एन पी ए शून्य टक्के आहे असे बाळासाहेब गुंजाळ यांनी सांगितले.

संस्थेचे उपाध्यक्ष सुहास गटकळ असून मुकुंद आवटे, कैलास आवटे, निंबा डोळस, ऍड सूर्यकांत काळे, प्रवीण गटकळ, गुलाब औटी, वसंत कुटे, मुबीन तांबोळी, संतोष बिलेवार, ज्योती हांडे, संगीता इंगळे संचालक म्हणून कार्यरत आहेत. तज्ञ संचालक म्हणून शांतीस्वर पाटील आणि अनिल कातळे काम पाहतात तर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नारायण हाडवळे जबाबदारी पार पाडत आहेत.