पुण्यात १४ वर्षाचा मुलगा २४ दिवसांपासून बेपत्ता ; अभिनेत्री जाह्नवी किल्लेकरचे काय आहे आवाहन ? पहा व्हिडिओ

पुण्यात १४ वर्षाचा मुलगा २४ दिवसांपासून बेपत्ता ; अभिनेत्री जाह्नवी किल्लेकरचे काय आहे आवाहन ? पहा व्हिडिओ
Share

पुणे – पुण्यातील हडपसर भागात असलेल्या सिग्नेट पब्लिक स्कूलचा १४ वर्षीय विद्यार्थी गेल्या २४ दिवसांपासून संशयास्पदरित्या बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. अजूनही त्याचा ठावठीकांना न समजल्याने त्यामुळे त्याचे पालक प्रचंड तणावात आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने या मुलाचा फोटो शेअर करत एक व्हिडिओ बनवला आहे. यात तिने हा मुलगा कुठेही दिसल्यास लगेचच संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

अनमोल मोतीलाल विश्वकर्मा हा ९ सप्टेंबर २०२६ पासून संशयास्पदरित्या बेपत्ता झाला आहे. या घटनेनंतर अनेक दिवस उलटूनही हा मुलगा अद्याप घरी परतलेला नाही. अशात पालक प्रचंड प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल हा हांडेवाडी रोड, हडपसर येथील ‘सिग्नेट पब्लिक स्कूल’मध्ये शिक्षण घेत आहे. व्हिडिओमधील फोटोवर दिलेल्या माहितीनुसार, हा विद्यार्थी शाळेतील परिक्षेत कॉपी करताना आढळला. तेव्हा शिक्षक त्याला ओरडले आणि ही बाब त्याच्या पालकांना सांगणार असल्याचे म्हटले. यामुळे हा मुलगा प्रचंड घाबरला आणि तो घरी गेलाच नाही. ९ सप्टेंबर रोजी तो अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी सर्व मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि परिसरात शोध घेतला. परंतु त्याचा कोणताही सुगावा लागलेला नाही.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रसिद्ध अभिनेत्री जाह्नवी किल्लेकर हिने व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत नागरिकांना मदतीचे कळकळीचे आवाहन केले आहे. “आपलं मूल जेव्हा हरवतं, तेव्हा आई-वडिलांना काय मानसिक त्रास होतो हे फक्त एक आई-वडीलच समजू शकतात. अनमोलचा शोध घेण्यासाठी प्रत्येकाने ही माहिती जास्तीत जास्त शेअर करावी,” अशी भावूक विनंती जाह्नवीनं केली आहे.

 

Vedh News