ब्रेकिंग न्यूज

भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यातून वाचण्याच्या प्रयत्नात महिलेच्या कडेवरील एक वर्षाचे बाळ खाली पडून जखमी

Share

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ सुरु आहे. नागरिकांच्या मानत भीतीचे वातावरण असतानाच जुनी सांगवी भागात धक्कादायक घटना घडली आहे. भटक्या कुत्र्याने हल्ला केल्यामुळे एका महिलेच्या काडीवरील एक वर्षाचे बाळ खाली पडून जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजता घडली. या घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या एक वर्षाच्या बाळाला कडेवर घेऊन मधुबन सोसायटी, लेन क्रमांक ४ येथील के. जी. डॉल्फिन स्कूल परिसरातून जात असताना भटक्या कुत्र्याने अचानक तिच्यावर झडप घातली. महिलेवर कुत्र्याने हल्ला करताच तिने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र या झटापटीत तिच्या हातातील बाळ खाली पडले. त्यामुळे एक वर्षाच्या बाळालाही दुखापत झाली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कधी करणार असा प्रश्न विचारला जात आहे.