ब्रेकिंग न्यूज

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या निधीला ४० कोटीची कात्री ; पिंपरी महापालिकेचा निर्णय 

Share

पिंपरी – पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पासाठी राखीव असलेल्या ४० कोटी रुपयांच्या निधीचे वर्गीकरण करण्यात आले आहे. हा निधी शहराच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी चालू असलेल्या विविध पाणीपुरवठा योजना आणि आंद्रा पाणी योजनेच्या भूमिगत जलवाहिनीच्या कामासाठी वापरला जाणार आहे. या निर्णयावर नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यातील पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रकल्पासाठी एकीकडे राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर पुन्हा प्रयत्न सुरू असतानाच, दुसरीकडे चालू अर्थसंकल्पातील ४० कोटी रुपयांचा निधी इतर प्रकल्पांकडे वळवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणखी रेंगाळण्याची भीती नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे या निधीमुळे इतर पाणीपुरवठ्याची कामे वेगाने पूर्ण होण्यास मदत होईल, असा दावा महानगरपालिकेने केला आहे.

निधी वर्गीकरणाचा हा प्रस्ताव सभेत मंजुरीसाठी आला असता, भाजपचे नगरसेवक राहुल कलाटे यांनी यावर कडाडून आक्षेप घेतला. त्यांनी थेट सभेतच प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शवला. “शहराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना, पवना जलवाहिनीसारख्या मुख्य प्रकल्पाचा निधी कमी करणे अत्यंत चुकीचे आहे. हा निधी इतर कामांसाठी वर्ग करू नये,” अशी आग्रही सूचना त्यांनी सभागृहात केली. तसेच, मूळ प्रकल्पाचा निधी कमी केल्यास प्रकल्पाच्या गतीला ब्रेक बसेल, याकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. इतर पाणीपुरवठा योजनांसाठी वेगळा निधी उपलब्ध करावा, पण पवना जलवाहिनीच्या हक्काच्या पैशांवर दरोडा टाकू नये, अशी मागणी नगरसेवकांनी केली.

या प्रकल्पासाठी एकीकडे राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर पुन्हा प्रयत्न सुरू असतानाच, दुसरीकडे चालू अर्थसंकल्पातील ४० कोटी रुपयांचा निधी इतर प्रकल्पांकडे वळवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.