रोजगार इच्छुक युवकांना मिळणार दहा हजार रुपयांपर्यंत मासिक स्टायपेंड
पिंपरी- महाराष्ट्रातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण, नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” महाराष्ट्र शासनातर्फे २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” राबवली जाणार आहे. महाराष्ट्रातील रोजगार इच्छुक युवकांनी आणि विविध…
