ब्रेकिंग न्यूज

तुमच्या माहितीसाठी.. पिनकोडऐवजी आता लवकरच ‘डीजी पिन’ ही नवीन प्रणाली येणार

Share

नवी दिल्ली- भारतात आता पारंपरिक ६ अंकी पिनकोडऐवजी ‘डीजी पिन’ ही नवीन प्रणाली आणण्याची तयारी सुरू आहे. केंद्रीय दळणवळण मंत्रालयांतर्गत डाक विभाग या आधुनिक तंत्रज्ञानावर काम करत आहे.

डीजी पिन म्हणजे काय?

हा एक डिजिटल भौगोलिक पत्ता असेल. यामुळे संपूर्ण देशातील कोणत्याही जागेचे नेमके लोकेशन शोधणे सोपे होईल. हा कोड अक्षांश-रेखांशवर आधारित असेल. याचे मुख्य फायदे म्हणजे पत्ता शोधण्यात होणारी मानवी चूक किंवा गोंधळ पूर्णपणे थांबेल. ई-कॉमर्स पार्सल, कुरिअर आणि टपाल सेवा थेट तुमच्या दारापर्यंत अचूक पोहोचतील. रुग्णवाहिका, अग्निशामक दल किंवा पोलिसांना आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी वेळेत पोहोचणे सोपे होईल. तसेच भविष्यात ड्रोनद्वारे डिलिव्हरी करण्यासाठी हा डिजिटल कोड अत्यंत उपयुक्त ठरेल. सध्या या प्रणालीवर काम सुरू असून, आगामी काळात ही सेवा टप्प्याटप्प्याने देशभरात लागू केली जाण्याची शक्यता आहे.