पिंपरी- शिवतेज नगर मधील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी चिंचवड येथील घरकुल चौकाजवळ श्री स्वामी समर्थ मंदिर येथे महिलांसाठी नागपंचमी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायणराव बहिरवाडे, नगरसेविका योगिता नागरगोजे, स्नेहा गुणवंत, क्षमा काळे, गीता पाटील, विद्या दुदुसकर, नीलिमा भंगाळे, स्मिता शिरसाट, अश्विनी केवाडकर, रेश्मा माधव, कार्याध्यक्ष छाया महाजन, महिला कार्याध्यक्ष सारिका रिकामे, आणि हरि नारायण शेळके काका, राजीव गुणवंत, दीपक बिरादार, चैतन्य बनकर, मेघराज बागी, रोहन नंदनवाड आदी उपस्थित होते.
यावेळी शेकडो महिलांनी नाग प्रतिमेचे पूजन केले. तसेच पारंपरिक पद्धतीचा झिम्मा, फुगडी, फेर आणि नृत्य सादर करून झोके खेळण्याचा देखील आनंद घेतला. नागाची प्रतिमा आणि कृत्रिम वारूळ तयार करून याची पूजा करण्यात आली. दूध, पाणी, नारळ यामुळे नागांची हानी होऊ नये म्हणून येथे कृत्रिम वारूळ तयार केले होते.
शिवतेज नगर मधील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी महिलांसाठी नागपंचमी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रत्येकीला माहेरी आल्याची भावना निर्माण होत आहे असे मत नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी व्यक्त केले.
