मोशीमध्ये २५ वर्षीय तरुणीचा खून भोसरी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

पिंपरी – मोशी परिसरातील मंत्रा मोमेंट हाउसिंग कमर्शियल ऑफिसच्या गाळा क्रमांक ७ जवळ एका २५ वर्षीय तरुणीचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियंका आकाश कांबळे (वय २५)असे मृत तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री २ वाजण्याच्या दरम्यान मोशी परिसरातील मंत्रा मोमेंट हाउसिंग कमर्शियल ऑफिसच्या गाळा क्रमांक ७ जवळ एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.
पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भोजराज मिसाळ करीत आहेत.





