ब्रेकिंग न्यूज

आयुर्वेदिक वृक्षांचे वृक्षारोपण भूगोल फाउंडेशन चा उपक्रम

Share

पिंपरी पुणे -मोशी संतनगर येथील पर्यावरण पुरक कार्य करणाऱ्या भूगोल फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आंबेगाव तालुक्यात देशी तसेच आयुर्वेदिक वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. सातगाव पठार भागातील पेठगावाजवळ सौरंग्या डोंगराच्या परिसरात तसेच कारेगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या प्रांगणात विविध देशी व आयुर्वेदिक वृक्षांचे वृक्षारोपण करून आपली वसुंधरा अधिक हिरवीगार व पर्यावरण वाढीस सहभाग या संकल्पनेतून भूगोल फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल नाना वाळुंज कारेगावचे सै्ारंग्या दत्त मंदिर ट्रस्टचे व सामाजिक कार्यकर्ते भानुदास कराळे ,बाळासाहेब कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा परिसर अधिक हिरवागार करण्याचे कार्य सातगाव पठार परिसरातील कार्यकर्त्यांच्या सहकार्याने वृक्षारोपण करून अधिक सुशोभित करण्याचे कार्य करण्यात आले.

सुरुवातीला महिलांच्या व मान्यवर सदस्यांच्या हस्ते वृक्ष पूजा करून वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये देशी व आयुर्वेदिक वृक्ष कदंब , कांचन, तामण, आपटा, अर्जुन,कुडा, करंज, वड,पिंपळ, मोहगनी,चिंच,कडुलिंब,बकुळ,अै्ादुंबर,पळस,जांभुळ,आंबा, असे २२५ वृक्ष लावण्यात आले.वरूण राजानेही हजेरी लावल्याने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यासाठी सर्वांना अजून उत्साह आला. तरी सर्व पर्यावरण प्रेमी सहकारी व मुलांनी आनंदी वातावरणात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात भूगोल फाउंडेशनच्या शिवमल्हार प्रिंटीग उद्योग समुहाच्या संचालक उद्योजक सुनीता बिरादार यांनी पाच हजार रूपयाचे वृक्ष दान व अनिल पोवार यांनी २५ वृक्षदान केले.इतर वृक्ष भूगोल फाउंडेशन मार्फत वृक्षारोपणासाठी देशीआयुर्वेदीक वृक्ष उपलब्ध करुन दिले.

यावेळी इंद्रायणी सेवा संघाचे विठ्ठल वीर,ग्रामीण साहित्यिक प्रा. लक्ष्मण वाळुंज , एकनाथ फटांगडे,महादेवशेठ वाळुंज , शशिकांत वाडते,मनोज माकोडे,सुनिल काटकर, आपला म्युझिकल ग्रुपचे संचालक अनिल घाडगे ,पर्यावरणप्रेमी सामाजिक कार्यकर्ते संजय रोकडे ,भरत तांबे, उद्योजक विजय ठाकुर, अनिल पोवार,विशाल शेवाळे ,प्रवीण पाटील, पार्थ दरंदळे सहभागी झाले होते.

या उपक्रमात महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता भूगोल फाउंडेशनच्या क्रियाशील सदस्य सौ शोभा फटांगडे, ज्योती दरंदळे,सुनीता बिरादार,मीना आखाडे, गवळीनगर पतसंस्थेच्या संचालक आशा महादेव वाळुंज, वसंतदादा हायस्कूलच्या प्राचार्या संध्या वाळुंज,वटेश्वर भजनी मंडळाच्या संगीता इचके,सिंधु नवले,मीना नायडु प्रतिभा पाटील, पिंपरी-चिंचवड मनपाच्या आदर्श शिक्षिका जयश्री सलतोगी, किर्ती सावंत,अमरिन पटेल ,अलिया पटेल तसेच इतर महिला सहभागी झाल्या होत्या.

तसेच यावेळी इतर अनेक सहकारी , उपस्थित होते. तेथील ट्रस्टच्या व कारेगावच्या ग्रामस्थांनी, पर्यावरणप्रेमींनी,महिलांनी मुलांनी वृक्षारोपण केलेली झाडे संवर्धन करण्यासाठी पुढाकार ,वसा घेतला आणि ती जगवण्याचा संकल्प केला.यावेळी प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त वरिष्ठ इंजिनयर निवृत्ती कराळे साहेब, बाबाजी कराळे,निवृत्ती घेवडे,स्वप्निल घेवडे,अनिल शिंदे,बाबाजी नाईकरे ,वैभव चक्कर व इतर अनेक मंडळीनी वृक्षारोपण करण्यास मदत केली.

यावेळी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल नाना वाळुंज म्हटले की आम्ही फक्त वृक्ष लावत नाही तर त्याचे संवर्धन करतो,संवर्धन करणारे बरोंबर काम करतो आणि दर तीन महिन्याला त्याचे फोटो मागवुन त्याची वाढ कशी झाली, काय करायला पाहिजे त्याला खताची आवश्यकता आहे का असे पाहुन त्यावर कार्यवाही करतात. मानवाची निर्मिती निसर्गाने केलेली आहे..जन्माबरोबर आपल्याला पहिल्यांदा श्वास घ्यावा लागतो..त्यानतंर आपण या जगात येतों…हा श्वास आपल्याला निसर्ग देतो… तसेच जोपर्यंत हा श्वास सुरू आहे… तोपर्यंत जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या गरजा.. अन्न, वस्त्र, निवारा देण्याचे कामं निसर्ग करतों…यामुळें मानवी जिवन हे निसर्गाला बांधील आहे.. निसर्गाला सोडून आपण एक मिनिट देखील जिवंत राहू शकत नाही… यामुळे लहानपणापासून मुलांवर निसर्गाचे संस्कार करणे गरजेचे आहे… हे संस्कार देण्याचे कार्य ही भूगोल फाउंडेशन करत असतें….हिच मुले उद्यांचा सुजाण नागरिक तयार होत असतो… निसर्गात झालेले संस्कार हे मानव कधीही विसरत नाही.. तेच आपल्या जीवनाला आकार देतात.