पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा उत्सवाच्या दरम्यान चेंगराचेंगरी, १७ भाविकांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा उत्सवाच्या दरम्यान चेंगराचेंगरी, १७ भाविकांचा मृत्यू
Share

कोलकाता- पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यामध्ये दुर्गापूजेदरम्यान झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत १७ भाविकांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक लोक जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कोलकातामधील शाम चोरबगान दुर्गापूजा मंडळामध्ये ही दुर्दैवी घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. भाविकांनी मोठ्या प्रमाणात देवीच्या पूजेसाठी गर्दी केली होती, त्यावेळी अचानक गर्दी उसळली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचे बोलले जात आहे.

शनिवारी संध्याकाळी दुर्गापूजेच्या मंडपात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. बाहेर पाऊस सुरू झाल्यानंतर मंडपाबाहेर थांबलेल्या लोकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गर्दीचा दबाव वाढला आणि काही जण खाली पडल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या परिस्थितीमुळे गोंधळ निर्माण झाला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, मंडपाच्या एका भागाची संरचना कोसळल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, दुर्घटना नेमकी गर्दीमुळे झाली की मंडपाच्या संरचनेशी संबंधित कारणामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ कलकत्ता मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी रुग्णालयात पोहोचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेनंतर संबंधित पूजा मंडपातील भाविकांचा प्रवेश थांबवण्यात आला.

पंतप्रधान नरेंदर मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या वारसदारांना २ लाखांची तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.

Vedh News