मालमत्ता कर आजच भरा ! ४ टक्के सवलतीचा लाभ घेण्याचा ३० सप्टेंबर शेवटचा दिवस..!

मालमत्ता कर आजच भरा ! ४ टक्के सवलतीचा लाभ घेण्याचा ३० सप्टेंबर शेवटचा दिवस..!
Share

पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील दुसऱ्या तिमाहीसाठी मालमत्ताधारकांना मालमत्ता कराच्या ऑनलाइन भरण्यावर ४ टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतीचा लाभ घेण्याचा आज, ३० सप्टेंबर २०२६ अखेरचा दिवस आहे त्यामुळे मालमत्ता धारकांनी त्वरित ऑनलाईन भरणा करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

१ जुलै २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत ५० हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी ४ टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. ऑनलाइन कर भरण्याच्या सुविधेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक व्हावी, यासाठी महानगरपालिकेकडून ऑनलाइन पद्धतीने कर भरण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे.

या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आज बुधवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाइन मालमत्ता कर भरण्याची मुदत आहे. त्यामुळे ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही, त्यांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन कर भरून सामान्य करामध्ये मिळणाऱ्या ४ टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, १ एप्रिल २०२६ ते २९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत ४ लाखांहून अधिक नागरिकांनी ६०१ कोटींचा मालमत्ता कर भरला आहे. चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर संकलनाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, ऑनलाइन तसेच इतर उपलब्ध माध्यमांतून नागरिकांकडून कराचा भरणा करण्यात येत आहे.

Vedh News