ब्रेकिंग न्यूज

आर्ट्स स्टुडिओच्या कला कार्यशाळेत चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक 

पुणे – धायरी परिसरातील मुठा कालव्याशेजारी असलेल्या पिनाक आर्ट्स स्टुडिओच्या कला कार्यशाळेत धातूचे साहित्य तसेच मोटारसायकल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नांदेडसिटी पोलिसांनी अटक केली. आकाश बाळू ननावरे (वय ३२, रा. दत्तवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी स्वतंत्र तपास पथक नेमले…

Read More

विद्यानंद बापट यांना मारहाण ; माध्यमांशी बोलत असतानाच अज्ञातांनी केला हल्ला

पुणे- गणेशोत्सव किंवा सार्वजनिक उत्सवात डिजे किंवा लाऊडस्पीकर वापरावर बंदी आणावी अशी मागणी केल्यानंतर सोशल मीडियावर विद्यानंद बापट हे नाव घराघरात पोचले आहे. याच विषयावर टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना काही तरुणांनी त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सव काळात पुण्यात डीजे बंदी आणि ध्वनीप्रदुषणावरुन वाद सुरु आहे. या मुद्द्यावर पुण्यातील…

Read More

दिव्यांग पत्नीसोबत आक्षेपार्ह कृत्य करून मोबाइलमध्ये चित्रीकरण केले ; सराईत गुन्हेगार पतीला अटक

पिंपरी- एका नराधम पतीने आपल्या दिव्यांग पत्नीचा विविध प्रकारे शारीरिक छळ करून तसेच तिच्यासोबत आक्षेपार्ह कृत्य करून त्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्याचा प्रकार मंगळवारी (१ सप्टेंबर ) उघडकीस आला आहे. संबंधित पती हा सराईत गुन्हेगार असून त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. याबाबतची माहिती अशी की, पीडित महिला दिव्यांग आहे. तिच्या पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर तिची…

Read More

दहीहंडीत पोलिसांची करडी नजर ; आक्षेपार्ह डान्स करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

पिंपरी-पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी उत्सवात दरवर्षी विविध सेलिब्रिटींना आमंत्रित केले जाते. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणच्या दहीहंडी उत्सवाला नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यंदा देखील दहीहंडीचा उत्सव जोशात साजरा होणार असल्यामुळे पोलिसांची या उत्सवाकडे करडी नजर ठेवली जाणार आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये काही ठिकाणी कार्यक्रमादरम्यान स्टेजवर अश्लील अथवा आक्षेपार्ह नृत्याचे…

Read More

पोलिसांच्या मुद्देमाल कक्षातून सात पिस्तुलांची चोरी, कचरा गोळा करणाऱ्या इसमास अटक

पुणे- एका कचरा गोळा करणाऱ्या व्यक्तीने पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षातून चक्क सात पिस्तुले चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार बंडगार्डन पोलिसांच्यामुद्देमाल कक्षामध्ये घडला. पिस्तुले चोरणाऱ्या व्यक्तीने पोलिस ठाण्यासमोरच एका व्यक्तीला पिस्तुलाचा धाक दाखवला. संबंधित व्यक्तीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी धावाधाव करून पिस्तुले चोरणाऱ्या इसमास ताब्यात घेतले. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी राकेशकुमार संजयकुमार…

Read More

गुन्हेगाराकडील पिस्तूल हाताळताना अचानक गोळी सुटून तरुण जखमी; एकाला अटक तर गुन्हेगार फरार

पुणे – गुन्हेगाराकडील पिस्तूल हाताळताना अचानक चाप दाबला गेल्याने गोळी सुटून तरुणाच्या मांडीत शिरल्याने तो जखमी झाला. त्याच्या साथीदाराने जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी साथीदाराला अटक केली आहे. मात्र पिस्तूल बाळगणारा गुन्हेगार मात्र तेथून पळून गेला. अविनाश दादासो मोरे (वय १९, रा. दत्तनगर, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे….

Read More

मोठी बातमी ! दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, मुंबई हायकोर्टाचे आदेश

मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशाचा ८ जून २०२० रोजी मृत्यू झाला होता. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुलीच्या मृत्यूच्या तपासात गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप करत नव्याने चौकशी आणि एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे. ८ जून २०२० रोजी मुंबईतील…

Read More

‘त्या’ माजी सैनिकाचा मृतदेह आढळला ; झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस

पुणे- बायकोचा खून करून 17 वर्षीय मुलाचा खुनाचा प्रयत्न करणाऱ्या माजी सैनिकाचा मृतदेह चांडोली गावच्या हद्दीत भीमा नदीकाठी आढळला आहे. झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. महेंद्र शिवाजी दौंडकर असे या माजी सैनिकाचे नाव आहे. बहिणीशी बोलत नसल्याचा रागातून महेंद्र दौंडकर याने आपली पत्नी दीपा दौंडकर हिचा राहत्या घरी खून केला. ही…

Read More

पोलिसांचा व्हाट्सअप मेसेज आणि सोनसाखळी चोर मुक्त, काय आहे प्रकरण ?

पुणे – सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात आरोपीला अटक केल्याची माहिती त्याच्या नातेवाइकांना केवळ एक व्हॉट्सॲप मेसेज पाठवून दिली. त्यावर न्यायालयाने आरोपीची अटक बेकायदा ठरवून त्याला तत्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले. चांदणी चौकात २८ मे २०२५ रोजी घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात बावधन पोलिसांनी धायरी येथील २८ वर्षीय तरुणाला अटक केली. त्याला पौड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर…

Read More

नवीन कारचे सेलिब्रेशन आले अंगाशी ! गुन्हा दाखल आणि कार जप्त करून पोलिसांनी दिला दणका

पुणे- पुण्यात एका महाभागाला नवीन कार घेतल्याचे सेलिब्रेशन चांगलेच महागात पडले आहे. नवीन कार खरेदी केल्यानंतर तिचे महामार्गावर फोटोशूट आणि व्हिडिओ शूटिंग करण्यात आले. हे फोटोशूट आणि व्हिडिओ व्हायरल होताच महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती अशी की, 27 ऑगस्ट रोजी सोमनाथ अशोक केदारी यांनी शोरूममधून…

Read More