ब्रेकिंग न्यूज

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी

Share

पिंपरी – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोक मान्य टिळक यांची जयंती निमित्त लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रशालेच्या संत तुकाराम नगर येथील सभागृहामध्ये उत्साहाने जयंती साजरी करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक अँड लक्ष्मण रानवडे म्हणाले की, त्या वेळेसचे काँग्रेसचे नेते व अध्यक्ष लोकमान्य टिळक यांनी इंग्रजां विरुद्ध समाजातील लढा उभा केला. तर अण्णा भाऊंनी सामाजिक असंतोषा विरुद्ध लढा दिला .

या कर्यक्रमास शिक्षण मंडळाचे माजी- उपाध्यक्ष मायला खत्री, राजू आवळे , शाळेच्या मुख्याधापिका मनीषा पाटील , संतोष इंगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संदिपान झोम्बाड़े , चेतन कांबळे , संतोष म्हात्रे , ज्ञानेश्ववर कांबळे, व या सह शाळेतील श्रुष्टि माशाळकर, सानिया कुन्नूर , करण मठपती , मेहबूब कन्नूर , आनंदी यादव या विध्यर्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट मराठी व इंग्लिश मध्ये अण्णाभाऊ साठे विषयी आपले मनोगत व्यक्त केले .

कार्यक्रमाचे संयोजन अण्णा भाऊ साठे सेवा संघाचे अध्यक्ष गणेश वैरागर , कार्याध्यक्ष सुधीर कांबळे व मनीष गुलाब शेंडगे, यांनी कार्यक्रमाचं संयोजन केले. या वेळी अण्णा भाऊ साठे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. शाळेतील सर्व मुलांना संघटनेचे वतीने खाऊचे वाटप करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्र संचालन दादाभाऊ आल्हाट यांनी केले . तर अण्णा भाऊसाठे सेवा संघाचे कार्याध्यक्ष सुधीर कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले .