मातृदिनानिमित्त रंगला आईच्या कवितांचा जागर

मातृदिनानिमित्त रंगला आईच्या कवितांचा जागर
Share

पिंपरी प्रतिनिधी :- म. सा. प. भोसरी शाखा आणि लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड आयोजित मातृदिनानिमित्त आईच्या कवितांचा जागर भोसरी येथे पार पडला.
प्रा. दिगंबर ढोकले यांनी आईच्या जुन्या कविता सादर करून सर्वांना भावुक केले.

कवी माधव ज्यूलियन, कवी यशवंत, स्वातंत्र्यवीर सावरकर, फ. मु शिंदे यांच्या आईच्या जुन्या गाजलेल्या सादर केल्या. तसेच हल्लीच्या काळातील बालकवी रुपक कारूळकर, कवी अनिल दीक्षित यांच्याही आईच्या कविता सादर करून कार्यक्रमात रंग भरले.

प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई.

आई मी चंद्रावर जाईन,

बाबांसाठी दगडगोटे आणीन, आजीसाठी चांदण्या आणीन

मामासाठी चंद्रावरचा ससा आणीन…

आणि आई तुझ्यासाठी मीच परत येईन…

यांसारख्या आईच्या काळजाच्या कविता प्रा. दिगंबर ढोकले यांनी सादर केल्या.उपस्थित लहान मुलींनी पण आईबद्दल आपली मते मांडली. जेष्ठ नागरिक दत्तात्रय मनकर, अंकुश गोरडे, सुदाम भोरे, म. सा. प. अध्यक्ष मुरलीधर साठे, प्रा. शिवलिंग ढवळेश्वर, सायली संत, सोमवंशी सर यांनी आपापल्या आवडत्या आईच्या कविता सादर करून आईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लबचे अध्यक्ष जीवन सोमवंशी यांनी केले, सूत्रसंचालन सायली संत यांनी केले. आभार प्रदर्शन जयश्री साठे यांनी केले.

 

 

Vedh News.com