पुण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस ; दोन तरुणीची सुटका

पुण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस ; दोन तरुणीची सुटका
Share

पुणे – हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय करणाऱ्या एका सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बंडगार्डन रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) छापा टाकून परराज्यांतील मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका केली. 

रोहन ऊर्फ राजकुमार (वय ३२), विवेक ऊर्फ मयंक कबीर (वय ३४), विक्रम ऊर्फ पियुष (वय ३४, तिघेही रा. आसाम) आणि त्यांचा एक साथीदार अशा चौघांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमवाडी-बंडगार्डन रस्त्यावरील एक्साइज कॉलनीजवळील हॉटेलमध्ये एजंटांमार्फत परराज्यांतील तरुणींना आणून वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ‘एएचटीयू’ कक्षाच्या पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून माहितीची खातरजमा केली. त्यानंतर पथकाने हॉटेलमध्ये अचानक छापा टाकला. या वेळी मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या परराज्यांतील दोन तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली.

आरोपी एजंट या तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत असल्याचे तपासात समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहाय्यक आयुक्त शंकर खटके यांच्या सूचनेनुसार ‘एएचटीयू’ पथकाने ही कारवाई केली.

 

Vedh News