पुणे जिल्ह्यात २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान ड्राय डे

पुणे जिल्ह्यात २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान ड्राय डे 
Share

पुणे – महाराष्ट्र विधान परिषद (MLC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी चिंचवड आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यात २१ ते २३ ऑक्टोबर २०२६ दरम्यान मद्यविक्रीवर निर्बंध (ड्राय डे) जाहीर करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत.

बुधवार २१ ऑक्टोबर २६ संध्याकाळी ४ पासून शुक्रवार २३ ऑक्टोबर मतदानाचा कालावधी संपेपर्यंत जिल्ह्यातील सर्व दारूची दुकाने, वाईन शॉप्स, बिअर बार, पब्स आणि परमिट रूम्स पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

तसेच, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणीच्या दिवशीही स्वतंत्र आदेशानुसार काही काळासाठी निर्बंध लागू केले जाऊ शकतात.

Vedh News