हिंजवडीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या आफ्रिकन महिला ताब्यात, डिपोर्टेशन प्रक्रिया सुरू

हिंजवडीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या आफ्रिकन महिला ताब्यात, डिपोर्टेशन प्रक्रिया सुरू
Share

पिंपरी- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हिंजवडी परिसरातील मारुंजी येथील एका गृहनिर्माण सोसायटीत व्हिसाची मुदत संपल्यानंतरही बेकायदा वास्तव्य करणाऱ्या युगांडा देशाच्या तीन आफ्रिकन महिलांना ताब्यात घेतले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी विभाग आणि हिंजवडी पोलिसांनी मारुंजी येथील एका सदनिकेवर छापा टाकला असता या महिला आढळून आल्या. त्यांच्या व्हिसाची मुदत संपलेली असतानाही या बेकायदेशीरपणे राहात होत्या.

डोरेक अहैसब्वे ही महिला विद्यार्थी व्हिसा घेऊन तर प्रोसी अंकुंडा आणि अमिना कातुसिमे या दोघी वैद्यकीय व्हिसाच्या नावाखाली भारतामध्ये आलेल्या होत्या. या तिघींच्याही व्हिसाची मुदत संपली होती आणि कोणत्याही प्रकारची परवानगी किंवा मुदतवाढ न घेता त्या अनधिकृतपणे राहत असल्याचे समोर आले. तिघींनाही ताब्यात घेऊन त्यांना मायदेशी पाठवण्याची (डिपोर्टेशन) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Vedh News