दुचाकीवरून खाली पडलेल्या महिलेच्या डोक्यावरून मोटारीचे चाक गेल्याने महिलेचा मृत्यू; मुलगा जखमी

दुचाकीवरून खाली पडलेल्या महिलेच्या डोक्यावरून मोटारीचे चाक गेल्याने महिलेचा मृत्यू; मुलगा जखमी
Share

पिंपरी – दुचाकीवरून प्रवास करत असताना रस्त्यावर पडलेल्या महिलेच्या डोक्यावरून मोटारीचे चाक गेल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला तर या अपघातात महिलेचा मुलगाही जखमी झाला. हा अपघात मारुंजी परिसरात घडला. 

वर्षा रवींद्र सुशीर (वय ३१, रा. कासारसाई, ता. मुळशी, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी मृत महिलेचे पती रवींद्र भानुदास सुशीर यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, रवींद्र सुशीर हे पत्नी वर्षा आणि मुलगा आयुष यांच्यासह दुचाकीवरून कासारसाई येथून हिंजवडीच्या दिशेने जात होते. प्रवासादरम्यान ते दुचाकीवरून रस्त्यावर पडले. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारीने त्यांना धडक दिली. या अपघातात मोटारीचे चाक वर्षा यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा आयुष जखमी झाला.

या घटनेनंतर रवींद्र सुशीर यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी श्रीहरी मोरहरी वाघमारे (रा. चांदखेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Vedh News