पीपल एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तपदी अण्णा बनसोडे यांची निवड योग्य – रामदास आठवले

पीपल एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तपदी अण्णा बनसोडे यांची निवड योग्य – रामदास आठवले
Share

पिंपरी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. सध्या मी या संस्थेचा अध्यक्ष आहे. या संस्थेचे पिंपरी चिंचवड शहरात भव्य शैक्षणिक संकुल उभारणे, तसेच या संस्थेच्या माध्यमातून राज्यात सर्वदूर शिक्षणाचे जाळे वाढवून दरवर्षी दोन लाख विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे. हे ध्येय गाठण्यासाठी या संस्थेच्या शासकीय नियामक मंडळावर महाराष्ट्र राज्य विधान सभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची निवड योग्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शासकीय नियामक मंडळावर महाराष्ट्र राज्य विधान सभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्त शनिवारी (दि. ३ ऑक्टोबर) बनसोडे यांचा भव्य नागरी सत्कार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पिंपरी येथे करण्यात आला आहे.

यावेळी सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य संजय शिरसाट, आमदार महेशदादा लांडगे, गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलास लांडे, भंते राहुल बोधी, पीपल एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त चंद्रशेखर कांबळे, नागसेन कांबळे, माजी महापौर योगेश बहल, मंगलाताई कदम, संजोग वाघेरे पाटील, माजी उपमहापौर अमर मुलचंदाणी, नगरसेवक राहुल भोसले, परशुराम वाडेकर, सिद्धार्थ बनसोडे तसेच प्रिया अण्णासाहेब बनसोडे, सुनील मगरे, संयोजक व सत्कार समितीचे पदाधिकारी सुरेश निकाळजे, अंजना गायकवाड, गोपाळ मोरे, निलेश निकाळजे, प्रमोद क्षीरसागर, गंगाताई धेंडे, नितीन ओव्हाळ, संदीप पिसाळ, राहुल सोनवणे आदींसह हजारो बंधू भगिनी उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले की, अण्णा बनसोडे हे शरद पवार व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले नेतृत्व आहे. अण्णा बनसोडे, मंत्री संजय शिरसाठ, मी स्वतः निवडणुकीत जिंकून आलो आणि हरलो देखील. बनसोडे ३ वेळा निवडून आले, शिरसाट ४ वेळा निवडून आले, मी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सलग ३ वेळा मंत्री आहे आणि आता चौथ्यांदा देखील मी मंत्री होईल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्याचे ध्येय ठेवून पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन ही संस्था वाढवली. अण्णा बनसोडे आणि मी देखील सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाऊ असे रामदास आठवले यांनी सांगितले.

मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, अण्णा बनसोडे यांना शुभेच्छा देताना शिरसाठ म्हणाले की, या संस्थेत तुम्ही चांगले काम करा, सरकारचा मंत्री म्हणून या संस्थेला आवश्यक निधी देण्याची जबाबदारी मी घेतो. तुम्हाला मिळालेल्या अधिकाराचा लोकांच्या कल्याणासाठी वापर करा, प्रगती करा पण स्वाभिमान घाण ठेवू नका, सध्याच्या कठीण काळात लोकशाही टिकवण्याची जबाबदारी तुमच्या, आमच्यावर आहे.

सत्काराला उत्तर देताना अण्णासाहेब बनसोडे म्हणाले की, १९४५ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या सोसायटीचा इतिहास म्हणजे आंबेडकरांच्या शैक्षणिक विचारांचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा इतिहास आहे. बाबासाहेबांनी शिक्षणाला समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन मानले त्यामुळे या महान विचारांच्या वारसाची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत मोठी गोष्ट आहे.

आमदार महेशलांडगे, गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलास लांडे यांनी देखील अण्णा बनसोडे यांना शुभेच्छा दिल्या. स्वागत सुरेश निकाळजे, सूत्रसंचालन अक्षय मोरे आणि आभार अंजना गायकवाड यांनी मानले.

Vedh News