श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा अग्निप्रदीपन समारंभ साजरा

वडगाव मावळ – श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या २९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ शनिवारी (दि २६) भागवताचार्य ह.भ.प. संतोषमहाराज पायगुडे व त्यांच्या पत्नी स्मिता संतोष महाराज पायगुडे यांच्या हस्ते व कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले,उपाध्यक्ष अनिल लोखंडे यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी संचालक माऊली दाभाडे, बापूसाहेब भेगडे, चेतन भुजबळ, धैर्यशिल ढमाले,धोंडीबा भोंडवे,राजेंद्र कुदळे, दत्तात्रय उभे, छबुराव कडू, यशवंत गायकवाड, संदीप काशिद, विलास कातोरे, दत्तात्रय जाधव, भरत लिम्हण, उमेश बोडके, शिवाजी कोळेकर, लक्ष्मण भालेराव, ज्योती अरगडे, शोभा वाघोले, माजी संचालक वसंतराव साखरे, बापूसाहेब पारखी, कारखान्याचे प्रभारी सचिव एम.टी.काळोखे, चीफ इंजिनिअर आर.बी.जगदाळे, चीफ केमिस्ट एस.डी. शिरसट, मुख्य शेतकी अधिकारी ए.व्ही. सावंत, प्रभारी चीफ अकाउंटंट एस.एस.दाभाडे, डिस्टीलरी इन्चार्ज एस.पी.पवार, प्रभारी ऊसपुरवठा अधिकारी एच.के. गोपाळे, लेबर ऑफिसर ए. पी. देशमुख उपस्थित होते.
यंदाच्या गळीत हंगामासाठी एकूण ५२०३ हेक्टरवर ऊस नोंद झाली असून त्यामधून ४ लाख १६ हजार,२८८ मे.टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल. सदर गळीत हंगामाकरिता कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व शेतक-यांनी कारखान्याकडे ऊस पाठवून सहकार्य करावे. कारखान्याने गळीत हंगाम चालू करण्याच्या दृष्टीने गाळप क्षमते इतकी ऊस तोडणी वाहतुक यंत्रणाचे करार केलेले आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे कारखान्याचा गळीत हंगाम सुरु करणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.जी. पठारे यांनी दिली.
कारखान्याचे संचालक चेतन भुजबळ यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.






