पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरु आहे नवीन ‘होर्डिंग्ज’ भ्रष्टाचार ?

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरु आहे नवीन ‘होर्डिंग्ज’ भ्रष्टाचार ?
Share

पिंपरी- पिंपरी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागामधील अधिकाऱ्यांनी आता भ्रष्टाचाराचा नवीन मार्ग काढला आहे. यामध्ये अधिकारी मालामाल होत असून महापालिका कंगाल होत आहे. आकाशचिन्ह विभागाचे अधिकारी आणि होर्डिंग मालकांनी मिळून महापालिकेच्या करोडो रुपयांची लूट केल्याचे बोलले जात आहे.

पिंपरी चिंचवड शहरात ४० फूट बाय २० फूट आकाराच्या होर्डिंग परवान्यासाठी महापालिका प्रत्येक जाहिरात कंपनीकडून एका वर्षाला १ लाख २ हजार रुपये शुल्क आकारते. यामधून महापालिकेचे अधिकारी आणि जाहिरात कंपनीचे मालक या दोघांनी एक अजब शक्कल लढवली आहे. होर्डिंगच्या एका बाजूसाठीचे शुल्क घ्यायचे आणि जाहिरात मात्र दोन्ही बाजूनी लावायची आणि दुसऱ्या बाजूचे एक लाखाचे शुल्क वाचवून आपल्या खिशात टाकण्याचा उद्योग सुरु केल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरु आहे.

क्यू आर कोड योजना वाऱ्यावर

शहरातील होर्डिंग्ज अधिकृत आहेत की नाहीत हे ओळखण्यासाठी आयुक्त विजय सूर्यवंशी आणि सह आयुक्त मनोज लोणकर यांनी आकाशचिन्ह परवाना विभागाला आदेश दिले होते की प्रत्येक होर्डींज वर क्यू आर कोड प्रिंट करा. हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर त्या बोर्डची सविस्तर माहिती मिळेल. परंतु या आदेशाला आकाशचिन्ह परवाना विभागातील अधिकाऱ्यांनी हरताळ फासला. एकूणच या प्रकारामुळे अधिकारी आणि होर्डिंग्ज मालक यांचे साटेलोटे असल्याचे दिसून येत आहे.

Vedh News