पिंपरी- गणेशोत्सवादरम्यान ध्वनीप्रदूषण करणाऱ्या ९१ मंडळांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हे दाखल करून ८६ डीजे स्पीकर आणि वाहने जप्त करण्यात आली आहेत.
परिमंडळनिहाय कारवाईमध्ये निगडी, चिंचवड, पिंपरी, सांगवी, संत तुकारामनगर, दापोडी, बावधन, काळेवाडी, हिंजवडी, वाकड, भोसरी, चाकण दक्षिण, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी आणि शिरगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील प्रकरणांचा समावेश आहे. १४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, परिमंडळ १ मध्ये सर्वाधिक २९ गुन्हे दाखल झाले असून २८ नग मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परिमंडळ २ मध्ये ४४ गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्व ४४ प्रकरणांमध्ये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परिमंडळ ३ मध्ये ८ गुन्हे दाखल करून ८ नग मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर परिमंडळ ४ मध्ये १० गुन्हे दाखल झाले असून ६ नग मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
