पुणे- पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या धामधुमीत प्रसिद्ध वकिल असीम सरोदे यांनी एक्स वर केलेली पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे. या निवडणुकीच्या रिंगणात विद्यानंद बापट यांनी उतरावे का, असा सवाल असीम सरोदे यांनी विचारला आहे.
पुण्याच्या गल्लीबोळात आणि सोशल मीडियावर सध्या एकच नाव गाजतंय ते म्हणजे विद्यानंद बापट ! डीजेच्या दणदणाटाच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला असून समाजाच्या विविध स्तरातून त्यांच्या मागणीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सध्या राज्यात पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक होणार आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातून निवडून येणाऱ्या उमेदवाराला विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे. ही निवडणूक विद्यानंद बापट यांनी लढवावी का ? असा प्रश्न असीम सरोदे यांनी विचारला आहे. त्यामुळे विद्यानंद बापट यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. असीम सरोदे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये काय म्हटलय? ते जाणून घेऊया.
“माझ्यासोबत उभ्या असलेल्या व्यक्तीचा आता खूप परिचय देण्याची आवश्यकता उरली नाही. ध्वनिप्रदूषणाच्या राक्षस विरोधात निर्भयपणे उभा असणारा ‘विद्यानंद बापट’. अनेकांच्या मनातील दुःख बोलणारा आणि उत्सवांचे विकृत स्वरूप, त्यातील ओंगळवाणेपणा चव्हाट्यावर आणणारा हिरो ठरला आहे. तर विद्याविभूषित, सुसंकृत, विनम्र, अभ्यासू, प्रत्येक सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारा विद्यानंद बापट आज जणू प्रत्येक घरातील आपुलकीचा सदस्य झालेला आहे. भाषेचा स्तर बिघडू न देता, विषयाला धरून बोलणारा आणि समाजाला वैश्विक बनविण्याची क्षमता असणाऱ्या विद्यानंद बापटने पदवीधर मतदारांमधून निवडणूक लढवावी का?” असं असीम सरोदे यांनी विचारले आहे.
माझ्यासोबत उभ्या असलेल्या व्यक्तीचा आता खूप परिचय देण्याची आवश्यकता उरली नाही.
ध्वनिप्रदूषणाच्या राक्षसा विरोधात निर्भयपणे उभा असणारा ‘विद्यानंद बापट’. अनेकांच्या मनातील दुःख बोलणारा आणि उत्सवांचे विकृत स्वरूप, त्यातील ओंगळवाणेपणा चव्हाट्यावर आणणारा हिरो ठरला आहे.
तर – – – विद्याविभूषित, सुसंकृत, विनम्र, अभ्यासू, प्रत्येक सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारा विद्यानंद बापट आज जणू प्रत्येक घरातील आपुलकीचा सदस्य झालेला आहे. भाषेचा स्तर बिघडू न देता, विषयाला धरून बोलणारा आणि समाजाला वैश्विक बनविण्याची क्षमता असणाऱ्या विद्यानंद बापट ने पदवीधर मतदारांमधून निवडणूक लढवावी का?
तुम्हाला काय वाटते?
— Asim Sarode (@AsimSarode) September 22, 2026
