ब्रेकिंग न्यूज

दिवंगत आदित्य नानासाहेब पिसाळ यांच्या स्मरणार्थ रक्तदान स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १२६ नागरिकांचे रक्तदान

Share

पिंपरी- दिवंगत आदित्य नानासाहेब पिसाळ यांच्या स्मरणार्थ आपुलकी मित्र मंडळ, आकुर्डी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान स्पर्धेला नागरिक तसेच विविध सार्वजनिक मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात विविध मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत तब्बल १२६ नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

या स्पर्धेत मंडळांच्या रक्तदानातील सहभागाच्या आधारे प्रथम क्रमांकाचे रु.२५,००० रोख पारितोषिक भैरवनाथ मित्र मंडळ, आकुर्डी गाव यांनी पटकावले. द्वितीय क्रमांकाचे रु. १५,००० रोख पारितोषिक तेज मित्र मंडळ, दत्तवाडी, तर तृतीय क्रमांकाचे रु. ७,००० रोख पारितोषिक जगदंब प्रतिष्ठान यांनी मिळविले.

रक्तदान करणाऱ्या सर्व नागरिकांसाठी आयोजित लकी ड्रॉमध्ये एक ग्रॅम सोन्याच्या नाण्याचे विजेते रितेश गायकवाड, आकुर्डी, तर सायकलचे विजेते मयूर पवार, ताथवडे ठरले. या उपक्रमासाठी संजीवनी ब्लड बँकेचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी नगरसेवक प्रसाद शेट्टी, उद्योजक अमित बाबर, आयुष निंबारकर ,पायल ज्वेलर्स दत्तवाडी, आणि स्काय ब्लू हॉटेल यांनी प्रायोजक म्हणून मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे या सामाजिक उपक्रमाला मोठे पाठबळ मिळाले.

कार्यक्रमास उद्योजक उमेश चांदगुडे, नगरसेवक प्रसाद शेट्टी, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेविका शैलजा मोरे, उद्योजक मा. अमित बाबर, कुणाल लांडगे, बाबूभाई शेट्टी, रणजित सोलंकी, जालिंदर काळभोर महेश काटे, नानासाहेब पिसाळ, नितीन काकडे, टाटा मोटर्स युनियनचे माजी कार्याध्यक्ष अशोक माने आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इखलास सय्यद, रमेश भोरकर, अभिजित पिसाळ, शाहरुख शेख, जावेद पठाण, सूरज मोरे, शुभम वरकुड, अमोल जैस्वार, निलेश कदम, सनी गोडसे, समाधान, दाजी चोपडे, संजय जगताप, समर्थ जगताप, प्रमोद शेट्टी, गिरीश शेट्टी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश परदेशी यांनी केले, तर आभार सुनील मोरे यांनी मानले.