ब्रेकिंग न्यूज

चिखली जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा उद्या गुरुवारी बंद

Image of a faucet spouting water. Useful image for any theme involving ecosystems, agriculture, drought, and conservation.
Share

पुणे- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्राचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

चिखली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये नवीन २०० दशलक्ष लिटर क्षमतेच्या प्रकल्पाचे काम सुरु आहे. या प्रकल्पासाठी उच्चदाब वीज जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे चिखली जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. ४) सकाळी होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने आणि अनियमित होण्याची शक्यता आहे, असे पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा परिसर

बोऱ्हाडेवाडी, इंद्रायणीनगर, सेक्टर ४,६,९,११,१२

शीवरस्ता, चक्रपाणी वसाहत, धावडेवाडी

मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, चोविसावाडी आणि लगतचा परिसर