ब्रेकिंग न्यूज

दिल्लीत इंडिया फ्लोरिस्ट असोसिएशनच्या ८ व्या वार्षिक अधिवेशनात पिंपरी-चिंचवडचा डंका

Share

नवी दिल्ली- इंडिया फ्लोरिस्ट असोसिएशनचे (IFA) ८ वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच( २८-२९ ऑगस्ट) दिल्ली येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनाला देशातील २४ राज्यांतील १०५ शहरांमधून २६३ फूल व्यावसायिक उपस्थित होते. या अधिवेशनात पिंपरी-चिंचवडच्या फुल व्यावसायिकांनी विविध पुरस्कार पटकावून शहराचे नाव उंच केले आहे.

या अधिवेशनासाठी पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातून सर्वाधिक सहभाग पाहायला मिळाला. महाराष्ट्रातून एकूण ९५ सभासद, त्यापैकी ४५ फ्लोरिस्ट सहभागी झाले होते. या अधिवेशनात व्यवसायवृद्धीसाठी उपयुक्त विविध सेशन्सद्वारे फ्लोरिस्टना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी प्रथमच IFA Yearbook चे प्रकाशन व वितरण करण्यात आले.

IFA महाराष्ट्र टीमतर्फे संस्थापक सदस्य रणजित मंडल, संचालक अभिजीत लाहोटी, प्रवक्त्या प्रियांका सिंघल, समन्वयक अजय जगताप आणि जेष्ठ फ्लोरिस्ट पंढरीनाथ म्हस्के ,विजय अबनावे यांच्या पुढाकाराने आनंद कुमार असोसिएशनचे अध्यक्ष यांचा भक्ती शक्ति प्रतिकृती, रतन टाटा यांची प्रतिमा, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

पिंपरी-चिंचवडचा डंका

शेवटच्या पारितोषिक वितरण समारंभात अनेक पुरस्कार जाहीर करण्यात आले, ज्यात पिंपरी-चिंचवडने बाजी मारली.

१. पंढरीनाथ म्हसके (स्नेह फ्लोरिस्ट, चिंचवड) यांना मानाचा “Floristry Ambassador” पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार IFA चे व्हाईस प्रेसिडेंट श्रीकांत कनोई यांच्या शुभहस्ते देण्यात आला.

२. केशव त्रिभुवन (ओम फ्लॉवर्स अँड डेकोरेटर्स, पिंपरी) यांना “Rising Star of IFA” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार IFA कमिटी मेंबर गोपाल सैनी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

३. तसेच पिंपरी येथील मयुरेश्वर पुष्प भांडारचे मालक श्याम मांडगे, संभाजीनगर-चिंचवडच्या फुलोराचे प्रमाणित फ्लोरिस्ट अविनाश लोखंडे आणि प्राधिकरण येथील नक्षत्र फ्लॉवर्सचे मालक नारायण चौधरी यांचाही विशेष गौरव करण्यात आला.

या यशाबद्दल पिंपरी-चिंचवड परिसरातील फूल विक्रेत्यांमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. या निमित्ताने पंढरीनाथ म्हसके यांची इंडिया फ्लोरिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रमुखपदी तर केशव त्रिभुवन यांची IFA प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.