ब्रेकिंग न्यूज

गायिका केतकी माटेगावकरकडून आर्थिक मदतीची विनंती ; कुणासाठी मागत आहे आर्थिक मदत ?

Share

गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर, जिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत पैशांची मदत मागितली आहे. गार्गी नावाच्या एका चिमुकलीला झालेल्या दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी केतकीने आपल्या चाहत्यांना विनंती केली आहे.

केतकीने पोस्ट केलेल्या व्हिडीओत तिने सांगितलं की, “तिला एक दुर्मिळ असा आजार आहे, एसएमए टाइप 1 म्हणजेच स्पाइनल मस्कुलर ॲट्रॉफी. यामध्ये आता तिला तिची मानही धरता येत नाहीये आणि पुढे पण काही कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात. तिला आता जवळजवळ 9 कोटींची ट्रीटमेंट आहे. इतकी रक्कम जमा करणं गरजेचं आहे आणि एवढी मोठी रक्कम जमा होणं, आपण एकत्र आल्याशिवाय ते शक्य नाहीये”

या व्हिडीओसोबतच तिने गार्गीच्या आईचं इन्स्टाग्राम अकाऊंटही लिंक केलं आहे. gargi_fights_sma असं हे अकाऊंट आहे. जिथं मदतीसाठी क्युआर कोड आणि बाकीची माहिती त्या पेजवर मिळेल असं तिने सांगितलं. बर्‍याच लहान मुलांना हा आजार होतो. आता गार्गीलाही तो झाला आहे. गार्गी लवकर बरी व्हावी, चला आपण या चिमुकलीला मदत करूया, तिला एक छान, निरोगी आयुष्य देऊया. माझी तुम्हाला विनंती आहे, प्लीस सपोर्ट करा.”, असं ती या व्हिडीओत केतकी म्हणाली आहे.

केतकी काय म्हणाली हे जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा

https://www.instagram.com/reel/DcomzDtzmas/?igsi=MTRvdmhhcXl0aGU5aw==