ब्रेकिंग न्यूज

रस्ता ओलांडणाऱ्या आठ वर्षांच्या चिमुकल्याचा भरधाव कारच्या धडकेत करुण अंत, मुंबईच्या उच्चभ्रू परिसरातील घटना

Share

मुंबई – एका भरधाव लक्झरी कारने एका आठ वर्षाच्या चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली. या अपघातात निष्पाप चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (30 ऑगस्ट) दुपारी वांद्रे पश्चिम येथील जिजामाता उद्यानासमोर घडली.

अंश गुप्ता (वय ८) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. या प्रकरणी इनोव्हा क्रिस्टा कार चालवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. मेघा रावल असे या महिला चालकाचे नाव आहे. संबंधित महिला भरधाव वेगात मोबाईलवर बोलत गाडी चालवत होती. फोनवर बोलण्याच्या नादात रस्ता ओलांडणाऱ्या अंश गुप्ता याच्या अंगावरुन तिने गाडी नेली.

जखमी अवस्थेतील अंशला तातडीने जवळील रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी अंशला तपासले असता त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

पोलीस या प्रकरणी सखोल तपास करुन अपघात नेमका कोणत्या करणामुळे घडला? याचा शोध घेत आहेत.