पिंपरी- काळभोरनगर येथील जीवन आधार ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा गुरुवारी उत्साहात संपन्न झाली. ऑगस्ट महिन्यातील वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांना विशाल काळभोर यांच्या वतीने विशेष भेट वस्तू देण्यात आली.
सभेची सुरुवात अंजली मोरे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या प्रार्थनेनी झाली. यावेळी मुख्य अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या कवी अनघा रत्नपारखी व पत्रकार स्मिता जोशी उपस्थित होत्या. सभेच्या अध्यक्षस्थानी विजय निकम होते.
अनघा रत्नपारखी यांनी आनंदी रहाण्याची गुरुकिल्ली म्हणजे काय हे ज्येष्ठांना संबोधित करीत सभेमध्ये चैतन्य निर्माण केले. स्मिता जोशी यांनी रंगभूमीतील अनुभव कथन करीत ज्येष्ठ रसिकांना संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळात नेले. यावेळी संघाचे संस्थापक विशाल काळभोर यांनी संघ सभासदत्व वाढविण्याचे आवाहन करीत आपला संघ हा एक कुटुंबाप्रमाणे असून संघाच्या पाठीशी मी सदैव उभा राहणार असे आश्वासन दिले.
यावेळी ऑगस्ट महिन्यातील वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांना विशाल काळभोर यांच्या वतीने विशेष भेट वस्तू देण्यात आली. संघाचे अध्यक्ष खंडेराव काळे यांनी प्रास्ताविकामध्ये संघाच्या प्रारंभापासून आजपर्यंतच्या वाटचालीचा गोषवारा मांडला. नेहमीप्रमाणे उपस्थित सभासदांमधून प्रमुख पाहुण्याच्या हस्ते ‘लकी ड्रॉ’ काढण्यात आला. यामध्ये भाग्यवान विजेता अनिल देसाई यांना भेटवस्तू देण्यात आली.
सभेचे संयोजन विजय सुर्वे, रवींद्र मांजरेकर, कमलताई धाईंजे यांनी केले तर इब्राहिम शेख, सचिन मोकाशी, अभय भोसले, दीपक गायकवाड, गणेश चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. सभेचे नियोजन आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश परदेशी यांनी केले.
