ब्रेकिंग न्यूज

हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोचे उदघाट्न पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार! पण कधी?

Share

पुणे – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

हिंजवडी मेट्रो कधी सुरु होणार हा प्रश्न पुणेकरांकडून सातत्याने विचारला जात होता. या मार्गाची चाचणी देखील करण्यात आली होती. दिरंगाईमुळे या मेट्रोचे मिम्स बनवले गेले. पण मेट्रो कधी सुरु होणार याबाबत ठोस माहिती मिळत नव्हती.

अखेर या मेट्रोच्या उदघाट्नाचा मुहूर्त लागला असून पुणेकरांसह लाखो आयटी कर्मचाऱ्यांचा रोजचा प्रवास सुकर करणारी हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरु होणार आहे. या मार्गावरील सेवेला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी २३ जुलैला मंजुरी दिल्याने सेवा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला.

पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या सेवेचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भेट दिली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिल्याचे म्हटले जात आहे.

माण ते बालेवाडी हा १२ किलोमीटरचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी सुरू केला जाणार आहे