पुणे- विमा बचत योजनेची मुदत सायबर चोरटयांनी वाघोलीतील एका इसमाची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथे राहणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीने एका खासगी कंपनीच्या आयुर्विमा बचत योजनेत गुंतवणूक केली होती. सायबर चोरटयाने त्यांच्याशी संपर्क साधून बचत योजनेची मुदत संपल्याचे व विमा कंपनीकडून रक्कम परत मिळणार असल्याचे सांगितले. तसेच रक्कम परत मिळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र व इतर करांच्या नावाखाली वेळोवेळी पैसे मागितले. तक्रारदाराने चोरट्याच्या विविध बँक खात्यात एकूण ४० लाख रुपये जमा केले. मात्र विम्याचे पैसे मिळाले नाहीत.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने वाघोली पोलीस ठाण्यात सायबर चोरटयाविरुद्धया फिर्याद दाखल केली. पोलिसांनी सायबर चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.
