खोपोली – मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावरील भाताण बोगद्यात ट्रॅव्हल बसने चार वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात होऊन आठ ते दहाजण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. आज सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून ट्रॅव्हल बस पुण्याच्या दिशेने जात होती. भाताण बोगद्याजवळ बसने पुढे असलेल्या वाहनांना धडक दिली. या अपघातात एक टेम्पो आणि तीन कारचे मोठे नुकसान झाले.
जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातामुळे एक्स्प्रेस वेवरील पुणे लेनवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
