एस आय आर मोहिमेत मतदारांची अंतिम यादी ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार

एस आय आर मोहिमेत मतदारांची अंतिम यादी ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार
Share

मुंबई- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होती. आता ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादीसंदर्भात ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येऊ शकतील. तसेच ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्राप्त दावे व हरकतींबाबत नोटीस देणे तसेच त्यांचा निपटारा करण्यात येईल.

या संपूर्ण प्रक्रियेनंतर महाराष्ट्रातील अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

Vedh News