ब्रेकिंग न्यूज

महाळुंगे येथे रस्त्यावरील खड्ड्याने घेतला ११ वर्षीय मुलाचा जीव

Share

पुणे – रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ११ वर्षीय मुलाचा ट्रक खाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास महाळुंगे येथील ग्रीन कोट सोसायटीसमोरील दुर्गा कॅफेजवळ ही दुर्घटना घडली. 

या घटनेची माहिती अशी की ११ वर्षाचा मुलगा त्याचे वडील आणि बहिणीसोबत दुचाकीवरून ट्यूशनला जात होता. रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्यांची दुचाकी घसरल्यामुळे मुलगा रस्त्यावर पडला त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकचे चाक चिमुकल्याच्या अंगावरून गेले. या अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला.

वडील आणि बहिणीच्या डोळ्यादेखत मुलाचे प्राण गेल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महाळुंगे परिसरातील खराब रस्ते आणि ठिकठिकाणी असलेल्या खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.