ब्रेकिंग न्यूज

चिखलीत तरुणाला लुटले; कारमध्ये बसवून २० हजार रुपये आणि मोबाईल हिसकावला

Share

चिखली- मनी ट्रान्सफरसाठी जात असलेल्या तरुणाला कारमध्ये बसवून काही अंतरावर नेल्यानंतर त्याच्याकडील मोबाईल आणि २० हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची घटना जाधववाडी, चिखली येथे घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश पांडुरंग क्षीरसागर (वय २७, रा. जाधववाडी), सुहास ऊर्फ डेव्हीड आणि पप्पू चव्हाण अशी आरोपींची नावे असून या प्रकरणी रंजनकुमार नंदकिशोर राजभर (वय २५, रा. जाधववाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रंजनकुमार हे १५ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मनी ट्रान्सफरसाठी जात होते. त्यावेळी आरोपीनी त्यांना कारमध्ये बसण्यास सांगितले.

फिर्यादी कारमध्ये बसल्यानंतर आरोपींनी काही अंतर पुढे नेऊन त्यांना खाली उतरवले. त्यानंतर त्यांच्या जवळील ओपो कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल आणि रोख २० हजार रुपये झडप मारून हिसकावून घेतले. चोरीस गेलेल्या मोबाईलचे दोन IMEI क्रमांक पोलिसांनी नोंदवले आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०४(२) आणि ३(५) अन्वये कारवाई सुरू केली आहे.पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून, घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.