ब्रेकिंग न्यूज

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंस्धेला रंगली देशभक्तीपर गीतांची मैफिल

Share

पुणे- भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंस्धेला ‘आपला म्युझिकल ग्रुप’च्या वतीने देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमात अनिल घाडगे, रणजित पाटील, भूषण देवधर, शशिकांत वाडते, विजय कांबळे, उमा मेनन, विद्या हजारे पाटील, भारती सातव, छाया अय्यर, स्नेहलता चव्हाण, सुषमा वनारसे यांनी कराओकेच्या साथीने सुरेल आवाजात गाणी सादर केली. झंकार म्युझिकल ग्रुपचे आयोजक आणि गायक प्रा. हरिश शरणागत यांना गेस्ट सिंगर म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

ज्यांनी देशाची सेवा केली अशा माजी सैनिकांचा हृद्य सत्कार यावेळी करण्यात आला. या माजी सैनिकांमध्ये रघूनाथ गंगाराम जाधव, निवृत्त सुभेदार, शंकरराव श्रीपती पिसाळ, निवृत्त सार्जंट, महावीर यशवंत जाधव, निवृत्त हवालदार, बाबाराव त्रिंबक मोटे, निवृत्त हवालदार, शंकर हनमंत कदम, निवृत्त हवालदार यांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे आयोजन अनिल घाडगे, उमा मेनन, विद्या हजारे पाटील, रणजित पाटील यांनी केले.