ब्रेकिंग न्यूज

‘कॉकरोच जनता पार्टी’ नंतर आता नव्या पक्षाचा उदय..एका रात्रीत लाखाहून अधिक फॉलोअर्स

Share

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना ‘दिमागी नक्सल’ हा शब्दप्रयोग वापरला होता. आता याच शब्दाचा आधार घेत ‘दिमागी नक्सल’ नावाच्या नव्या ऑनलाईन पक्षाची स्थापना झाली आहे. पाहता पाहता एका रात्रीत या पक्षाच्या इन्स्टाग्राम पेजला १,८१,००० हून अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला स्वातंत्र्यदिनानिमित्त संबोधित करताना म्हटले होते की सरकारने सशस्त्र माओवाद्यांविरुद्ध विजय मिळवला आहे. परंतु या विचारसरणीचे सहानुभूतीदार अजूनही तरुणांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि त्यांचे ब्रेनवॉशिंग करण्यासाठी संधी शोधत आहेत. त्यांनी अशा ‘बौद्धिक नक्षलवाद्यांना’ ओळखून त्यांना एकाकी पाडण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर समाज माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याच शब्दप्रयोगावर आधारित एक उपहासात्मक पक्ष उदयास आला आहे. त्याचे नाव ‘दिमागी नक्सल’असे आहे. पक्षाच्या इंस्टाग्राम खात्यावर आणि त्याच्या बायोमध्ये असे म्हटले आहे की, त्याचे ब्रीदवाक्य “विचार करा, संशोधन करा आणि निषेध करा हे आहे. इंस्टाग्राम बायोमध्ये असे म्हटले आहे की, पक्षाचे संस्थापक एक बुद्धिमान भारतीय आहेत. तर सह-संस्थापक ५६ इंच उंचीचे पुरुष आहेत. इंस्टाग्राम खाते तयार करण्याची नेमकी तारीख अज्ञात आहे, परंतु ते ऑगस्ट २०२६ च्या सुमारास तयार केले गेले असावे. सोशल मीडिया पक्षाने सोमवारी आरोप केला की त्यांच्या इंस्टाग्राम खात्यावर सायबर हल्ला झाला आहे.

आता बघूया, ते आमचा आवाज दाबण्यात यशस्वी होतात की नाही. त्यांनी आपली विचारधाराही मांडली, की ते भगतसिंग यांच्या विचारधारेचे पालन करतात. आम्ही भगतसिंग यांचे अनुयायी आहोत. जर त्यांनी आमचे खाते निलंबित करण्याचा किंवा आम्हाला देशद्रोही म्हणण्याचा प्रयत्न केला, तर हे लक्षात ठेवा की ते भगतसिंग यांचा अपमान करत आहेत असेही त्याच्या बायोमध्ये म्हटले आहे.