ब्रेकिंग न्यूज

पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील 37 अधिकारी आणि अंमलदारांचा राष्ट्रपती पदकाने गौरव

Share

पुणे- पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती पदक, अतिउत्कृष्ट सेवापदक, उत्कृष्ट सेवापदक आणि विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्यासह 21 पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना अतिउत्कृष्ट सेवापदक व उत्कृष्ट सेवापदक मिळाले आहे. तर 15 पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे.

गुणवत्तापूर्ण आणि उल्लेखनीय सेवेसाठी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या दीर्घकाळच्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी हा गौरव करण्यात आला आहे. अतिउत्कृष्ट सेवा पदकासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, सपोआ विठ्ठल कुंबडे, पोलीस निरीक्षक नितीन गिते, अनिल विभुते, अरविंद पवार, गोरखनाथ कुंभार, पोलिस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी, सपोफौ नागेश माळी, राजेंद्र शिंदे, सुनील कानगुडे, राजू जाधव, आदिनाथ मिसाळ आणि पोलिस हवालदार रामदास बारटक्के यांचा समावेश आहे.

उत्कृष्ट सेवा पदकासाठी पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सुहास आवाड, रविकिरण नाळे, सचिन शिर्के, सपोनि सचिन घाटे, सपोफौ दीपक महाजन, राजेंद्र कोनेरी, पोलीस हवालदार विवेक जगदाळे, अनिल साळुंखे, अमोल निघोट, संतोष शिंदे, आशिष बोटके, कामिनी पवळे आणि मपोशि नुतन जाधरी यांचा सन्मान करण्यात आला आहे.

विशेष सेवा पदकासाठी पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम, पोलीस उपनिरीक्षक सागर देवकर, महेश सातपुते, गणेश आठवे, दत्तात्रय सुकाळे, श्रीकांत गुरव, महादेव भालेराव, आबा कटपाळे, प्रकाश पारखे, राहुल दुधमल, लक्ष्मण मोगले, अनिल टाफे, चंद्रशेखर मोरखंडे, राजेंद्र पानसरे आणि चिरंजीव दलालवाड यांची निवड करण्यात आली आहे.