ब्रेकिंग न्यूज

सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल व ६ जिवंत काडतुसे जप्त, ५ आरोपीना अटक

Share

पुणे- पोलीस रेकॉर्डवरील सराईत ५ गुन्हेगारांना जेरबंद करून त्यांच्याकडील ४ पिस्टल व ६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पथकाने १३ ऑगस्ट रोजी केली.

सुफियान बशीर शेख (वय २२, रा. जैन टॉवर समोर, धनकवडी), निलेश प्रभुलिंग कुंभार (वय २१, रा. रजनी कॉर्नर, काकडे चाळ, बालाजीनगर), तुकाराम बाबासाहेब गवते (वय १९, रा. रजनी कॉर्नर, बालाजीनगर), ऋषभ ऊर्फ ऋषि शिवाजी भगत (वय २३, रा. त्रिमुर्ती चौक, भारती विद्यापीठ), अमित राजाराम पिलावरे (वय २५, रा. सुभेदार तालीमजवळ, शुक्रवार पेठ) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्यापैकी काही जणांवर खून, खुनाचा प्रयत्न केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पथक १३ ऑगस्ट रोजी गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे व उज्वल मोकाशी यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सहकारनगर येथील वनशिव वस्ती येथे काही जण संशयितरित्या थांबले असून त्यांच्याकडे अग्निशस्त्र आहेत. या मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी करुन पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख ६१ हजार २०० रुपयांचे ४ पिस्टल व ६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, तेजश्री पवार, शिवानंद कायगुडे, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, कुंदन शिंदे, नागनाथ राख, विनोद चव्हाण, संदिप शिर्के, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे, ओमकार कुंभार, आशिष यादव, शंकर कुंभार, विजय पवार व विनायक वगारे यांनी केली आहे.