ब्रेकिंग न्यूज

आळंदीमध्ये बालविवाहाचा धक्कादायक प्रकार, नातेवाईकांसह मंगल कार्यालय संचालकांना अटक

Share

पुणे- नवरीचे वय १८ आणि नवरदेवाचे कायदेशीर वय २० असताना त्यांचा विवाह लावून दिल्याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मंगल कार्यालयाच्या संचालकांसह नातेवाइकांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार देवाच्या आळंदीमध्ये अलंकापुरी मंगल कार्यालयात हा विवाह सोहळा पार पडला. विवाहाच्या वेळी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होते, परंतु मुलाचे (नवरदेवाचे) वय २० वर्षे ९ महिने होते. दौंड तालुक्यातील बिभिषण मधुकर जगदाळे यांनी याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे.

आळंदी पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन करून बालविवाहाला प्रोत्साहन दिल्याबद्दल आणि सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल अलंकापुरी मंगल कार्यालयाचे संचालक निखिल संभाजी साठे, गणेश धनंजय साठे आणि मुलीचे व मुलाचे ४ ते ५ जवळचे नातेवाईक यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सर्व आरोपींवर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मधील कलम १० आणि ११ अन्वये कारवाई सुरू करण्यात आली आहे. आळंदी पोलीस पुढील तपास करीत आहेत