पिंपरी- पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांनी हैदोस मांडला असून ७ भटक्या कुत्र्यांनी एका ४ वर्षाच्या चिमुरडीवर जीवघेणा हल्ला केला. ही घटना म्हेत्रे वस्ती भागात घडली. सुदैवाने या घटनेत चिमुरडी बचावली पण तिच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या.
पिंपरी चिंचवडच्या म्हेत्रे वस्ती भागात भटक्या ७ भटक्या कुत्र्यांनी चिमुरडीवर जीवघेणा हल्ला केला. अशिंका मिश्रा असे या चिमुरडीचा नाव आहे. या कुत्र्यांनी अशिंकाला सर्व बाजूंनी घेरले. या हल्ल्यात कुत्र्यांनी अशिंकाच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले. तिचे किंचाळणे ऐकून आसपासच्या नागरिकांनी धाव घेत या कुत्र्यांना हाकलून दिल्यामुळे तिची सुटका झाली. या हल्ल्यात अंशिकाच्या डोक्याला, पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्या जखमावर तब्बल 85 ते 90 टाके घालावे लागले आहेत. स्थानिकांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यामुळे अशिंकाच्या शरीरावर तब्बल 90 टाके पडले आहेत.
प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले की सुरुवातीला एक कुत्रा आला आणि त्याने हल्ला केला. त्यानंतर इतरही कुत्री आली आणि त्यांनीही हल्ला केला. या घटनेने पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने तब्बल ७ कोटी खर्च करून शहरातील भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली होती का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
