ब्रेकिंग न्यूज

खड्ड्यातील पाण्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू , पुण्यातील दिघी गावातील घटना

Share

पिंपरी- शाळेच्या मागे पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून एका १५ वर्षाच्या शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना दिघीमधील मॅगझीन चौकाजवळ घडली.

आश्वेत अनिल भोसले (वय १५ रा. संत गजानन महाराज नगर, दिघी ) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. आश्वेत हा दिघी येथील रामचंद्र गायकवाड शाळेमध्ये इयत्ता ९ वीत शिकत होता.

घटनेची माहिती अशी की शनिवारी परतीच्या प्रवासातील संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे आगमन होणार असल्यामुळे शाळा लवकर सुटली होती. अश्वेत घरी आल्यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आश्वेत हा मित्रांच्या समवेत मॅगझीन चौकाजवळील मोझे शाळेच्या मागे असलेल्या मोठ्या खड्ड्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यात खेळण्यासाठी गेला. खेळताना तो अचानक पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच तो पाण्यात बुडाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अश्वेतला पाण्याबाहेर काढून त्याच्या पालकांना माहिती देण्यात आली. या घटनेने दिघी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.